BJP Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यातून 'ते' दोन शब्द गायब...'जुमला पत्र' म्हणत विरोधकांची कडाडून टीका

BJP Manifesto 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जारी केलेले 'संकल्प पत्र' हे खोट्या आश्वासनांचे (जुमला) पत्र असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
Opposition Parties Criticize BJP Manifesto Lok Sabha Election 2024 for Not Addressing Inflation unemployment marathi news
Opposition Parties Criticize BJP Manifesto Lok Sabha Election 2024 for Not Addressing Inflation unemployment marathi news

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जारी केलेले 'संकल्प पत्र' हे खोट्या आश्वासनांचे (जुमला) पत्र असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द भाजपच्या जाहीरनाम्यातून आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून गायब असल्याचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीची योजना पूर्णपणे स्पष्ट आहे. 30 लाख पदांवर भरती आणि प्रत्येक शिक्षित युवकाला एक लाख रुपये पगाराची पक्की नोकरी, युवावर्ग यावेळी मोदींच्या आश्वासनाला फसणार नाही. तर काँग्रेसचा हात मजबूत करुन देशात रोजगार क्रांती आणणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

तर कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपचे संकल्प पत्र हा देखावा असून त्यांचा खरा संकल्प संविधान बदलण्याचा आहे. देश, समाज आणि लोकशाही विरोधी सर्व कट भाजप आधी तळातून सुरु करते. सुरुवातीला त्यांचे नेते जनतेसमोर संविधानाची शपथ घेतात आणि रात्री रात्री संविधान संपविण्याची पटक​था लिहिली जाते. सत्ता प्राप्तीनंतर संविधानावर हल्ला केला जातो. भाजपची संविधान बदलाची मोहीम सर्वांनी एकजूट होऊन हाणून पाडण्याची वेळ आली आहे.

Opposition Parties Criticize BJP Manifesto Lok Sabha Election 2024 for Not Addressing Inflation unemployment marathi news
Gold Silver Rates : इराण-इस्त्राइल यांच्यात टेन्शन वाढलं... सोनं-चांदी अजून महागणार?

समाजाच्या सर्व घटकांच्या हिताचे काम करण्यात पंतप्रधान मोदी यांना अपयश आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तर भाजपच्या संकल्प पत्राला कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी माफी पत्राची उपमा दिली. दलित, शेतकरी, युवक आणि आदिवासींची पंतप्रधानानी माफी मागावी, असेही खेडा म्हणाले.

महागाईने जनता होरपळून निघाली आहे. गॅस सिलेंडरचे दर 300 रुपयांवरुन 1200 रुपयांवर गेले आहेत. डिझेलच्या किंमती 55 वरुन 90 रुपयांवर गेल्या आहेत. खर्च कसा भागवायचा, याची चिंता जनतेला लागली आहे, अशावेळी भाजपने जुमलापत्र सादर केले आहे. भाजपवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी केली. सपा, राजदसह अन्य विरोधी पक्षांनीही भाजपच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल केला आहे.

Opposition Parties Criticize BJP Manifesto Lok Sabha Election 2024 for Not Addressing Inflation unemployment marathi news
Babasaheb Ambedkar: ...तर संविधान जाळणारा मी पहिला व्यक्ती असेन; आंबेडकर संसदेत असं का म्हणाले होते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com