विरोधकांनी सहकार्य करावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नवी दिल्ली : देश हिताची अनेक विधयके पावसाळी अधिवेशनात मंजूर करू. यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापुर्वी नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत सहकार्य करण्याचे आवाहन सर्व विरोधी पक्षांना करण्यात आले. या अधिवेशनात 46 विधयकांवर चर्चा होण्याची आशा आहे.

मोदींनी आवाहन केले असले तरी, दतिल आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरणार असल्याचे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. या अधिवेशनात महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, मॉब लिंचिंगप्रकरणी विरोधक सरकारवर चांगलाच हल्लाबोल करतील असे वाटत आहे. 

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी प्रमुख नेत्यांची भेट घेऊन अधिवेशन काळात सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनीही अधिवेशन कोणत्याही अडथळ्या शिवाय योग्य पद्धतीने पार पडण्याची आशा व्यक्त केली आहे.

Web Title: Opposition should cooperate - PM Narendra Modi