काश्‍मीर विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

जम्मू : कथुआ जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद आज जम्मू आणि काश्‍मीरच्या विधानसभेत उमटले. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी घोषणांच्या गदारोळात सभात्याग केला.

नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस, माकप आणि इतर पक्षांच्या आमदारांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कथुआ जिल्ह्यात गुज्जर समुदायातील नागरिकांचे संरक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांनी केली. कथुआ जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही त्यांनी केली.
 
Web Title: opposition walk out from kashmir assembly