मुख्य सचिवांना व्यक्तिशः उपस्थित राहण्याचा गोवा लोकायुक्तचा आदेश 

Orders to Goa Lokayukta to be personally present to the Chief Secretaries
Orders to Goa Lokayukta to be personally present to the Chief Secretaries

पणजी - काँग्रेसचे माजी आमदार व हल्लीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्ध भू संपादन प्रक्रिया घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत आज गोवा लोकायुक्तने राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने 23 नोव्व्हेंबरला व्यक्तिशः सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचा आदेश दिला. 

लोकायुक्तने मागील सुनावणीवेळी मुख्य सचिवांना नोटीस बजावून शिरोडकर यांच्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेसंदर्भात अहवाल व त्याचे दस्ताएेवज घेऊन आज (14 नोव्हेंबर) उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र आज ते अनुपस्थित राहिल्याने हा आदेश देण्यात आला. अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी ही तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com