Oscar Awards : "आता याचंही क्रेडिट घेऊ नका"; विरोधी पक्षनेत्यांचा PM मोदींना टोला | Oscar awards Pm narendra modi Mallikarjun Kharge Congress Parliament session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Awards
Oscar Awards : "आता याचंही क्रेडिट घेऊ नका"; विरोधी पक्षनेत्यांचा PM मोदींना टोला

Oscar Awards : "आता याचंही क्रेडिट घेऊ नका"; विरोधी पक्षनेत्यांचा PM मोदींना टोला

नाटू नाटू हे गाणं आणि एलिफेंट व्हिस्पर्स या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्याविषयी संसदेच्या अधिवेशनामध्येही चर्चा झाली. फक्त शुभेच्छाच नव्हे तर यावरुन पंतप्रधान मोदींना टोलाही लगावण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऑस्कर पुरस्कारावरुनच मोदींना टोला लगावला आहे. ऑस्कर मिळणं हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे, असंही ते म्हणाले. "आमची सत्ताधारी पक्षाला आणि मोदीजींना विनंती आहे की, त्यांनी या गोष्टीचं श्रेय घेऊ नये. आम्ही लिहिलं, आम्ही दिग्दर्शित केलं, असं काही म्हणू नये. "

यानंतर सभागृहामध्ये हास्याची लकेर उमटली. विरोधी पक्षापासून सत्ताधारी पक्षातले सर्वच नेते हसत होते. मात्र विरोधी पक्षाने या गोष्टीवर आपला आक्षेप नोंदवला आहे. सभागृहाचे नेते यामध्येही विभाजन करत आहेत. जयराम रमेश म्हणाले की, हा आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारे विभाजन करु नये.