मनिष सिसोदियांच्या विशेष अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

वृत्तसंस्था
Friday, 7 February 2020

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजदानीत अनेक घाडमोडी घडताना दिसत आहेत. अशातच दिल्ली सरकारमधील एका बड्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी या गोपाल कृष्ण माधव या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गोपाल कृषण माधव हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे विशेष अधिकारी (OSD) असल्याचे समजते. जीएसटी संबंधित दोन लाख रूपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माधव यांना चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात तत्काळ घेऊन जाण्यात आले आहे.  यासंदर्भात मनिष सिसोदिया यांची भूमिका अजून समोर आलेली नाही. तसेच सीबीआयनेही याबाबत आणखी माहिती देण्यास नकार दिला आहे. माधव हे २०१५ पासून सिसोदियांसोबत काम करत आहेत. दिल्ली निवडणूकांच्या दोन दिवस आधी ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच यामुळे राजकीय आरोपांच्या फैरी पुन्हा एकदा झडणार असे चित्र आहे.

चीनमधून आतापर्यंत किती भारतीयांची सुटका केली ते वाचा

दिल्ली विधानसभा निवडणूका उद्या (ता. ८) पार पडतील. त्या व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह ४० हजार जवान या सुरक्षेच्या कामात असतील. तसेच १९ हजार होमगार्ड पोलिसही तैनात असतील.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OSD of Manish Sisodia arrested while taking bribe