काँग्रेस शीख दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ देतंय- जेटली

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

काँग्रेस नेते सज्जन कुमार याच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत असल्याची टीका केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते सज्जन कुमार याच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत असल्याची टीका केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.

अरुण जेटली म्हणाले की, या दंगलप्रकरणात शीख समाज काँग्रेसच्या ज्या दुसऱ्या एका नेत्याला दोषी मानते त्या नेत्याला काँग्रेस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ देत आहे. शिक्षा सुनावण्यात आलेला सज्जन कुमार हा 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीचे प्रतिक आहेत. या प्रकरणात आता शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे.

पुढे ते म्हणाले की या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. न्यायालयाची ही खूप मोठी कामगिरी आहे. आमच्यापैकी अनेक जण या हत्याकांडाचे साक्षीदार होते. सर्वात भयंकर असे हे हत्याकांड होते. त्यावेळी काँग्रेस सरकार दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले होते.

Web Title: Other Accussed Regarding Sikh Riots Congress Is Giving Oath To Him Today