इम्रान खान यांनी पठाणाचा मुलगा असल्याचे आता दाखवावेच: मोदी

Narendra Modi
Narendra Modi

टोंक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देताना सांगितले, की पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणालो होतो की आपण आतापर्यंत खूप लढलो. आता आपण गरिबी आणि निरक्षरतेविरुद्ध लढले पाहिजे. तेव्हा ते म्हणाले होते, की मोदीजी मी पठाणचा मुलगा आहे. कधी खोटे बोलत नाही. आज तेच शब्द इम्रान खान यांनी सत्यात उतरविले पाहिजे.  

मोदी म्हणाले, ''मला आपल्या जवानांबद्दल अभिमान आहे, की त्यांनी पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांचा बदला 100 तासांमध्ये घेतला. आज जगातील प्रत्येक संघटना पुलवामातील हल्ल्याविरोधात बोलत आहे. सीमेवरील आपल्या जवानांवर, सरकारवर विश्वास ठेवा याचा बदला पुरेपूर घेतला जाईल. तुमचा प्रधानसेवक जगभरात दहशतवाद्यांना पुरविण्यात येणाऱ्या साधने बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत दहशतवाद्यांचे कारखाने सुरु राहतील, तोपर्यंत जगात शांतता निर्माण होणे अशक्य आहे. दहशतवाद्यांचे कारखाने बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर आल्याने मीच हे काम करणार. हा बदललेला हिंदुस्तान असून, हल्ला गुपचूप सहन करणार नाही. आम्ही दहशतवादाला चिरडण्याचे जाणतो. आमची लढाई काश्मीरसाठी आहे, काश्मीरमधील नागरिकांविरोधात नाही. आज देशातील प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहे. पण, काही जण भारतात राहुनही पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्याने आता पाकिस्तान खूप अडचणीत सापडला आहे.''

राजस्थानमधील टोंक येथे पंतप्रधान मोदी यांनी संकल्प सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करत विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com