esakal | 'आमचा ऑक्सिजनचा पुरवठा केंद्राने उत्तर प्रदेशकडे वळवला'

बोलून बातमी शोधा

yogi aadityanath
'आमचा ऑक्सिजनचा पुरवठा केंद्राने उत्तर प्रदेशकडे वळवला'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे

कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशभर ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रत्येक राज्याला अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा लागत आहे. ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा केंद्राने उत्तर प्रदेशकडे वळवला, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी केला.

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पण केंद्र सरकार मात्र भाजप शासित राज्यांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देत आहे. राज्यात २० हजार ऑक्सिजन सिलिंडर आहेत. ते भरण्यासाठी आम्हाला ऑक्सिजन कुठून मिळणार? पश्चिम बंगालमधील स्थिती चिघळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. जागतिक आरोग्य संघटना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याचं आवाहन करत आहे. पण केंद्र सरकार काय करतंय? असा प्रश्नही यावेळी ममतांनी उपस्थित केला.

बंगालचा ऑक्सिजन बाहेर नको, आरोग्य खात्याचे केंद्राला पत्र

राज्यात उपलब्ध असलेला ऑक्सिजन दुसरीकडे देण्यात येऊ नये, अशी आवाहन पश्चिम बंगाल सरकारने केंद्राकडे केले आहे. त्याबाबत आरोग्य खात्यातर्फे शुक्रवारी एक पत्र पाठविण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यातील विविध प्रकल्पांमधील २०० मेट्रीक टन ऑक्सिजन इतरत्र वाटप करायचे निश्चीत केले आहे. राज्यातील रुग्णांचा सध्याचा आकडा व त्यातील वाढ बघता दोन आठवड्यांत ऑक्सिजनची गरज प्रतिदिवशी ४५० मेट्रीक टनपर्यंत वाढेल, असे कारण पत्रात नमूद करण्यात आले.