दिलासादायक ! भारतात दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी केली करोनावर मात

over 2 lakh coronavirus patients were recovered in india
over 2 lakh coronavirus patients were recovered in india
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली असून देशातील २ लाख लोकांना आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून गुरूवारी दिवसभरात १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता वाढत असल्याचे दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९६ टक्के आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण दोन लाख ४ हजार ७११ रुग्ण बरे झाले असून १ लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या व ७.७८ टक्के रुग्णांची कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान, देशात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक झाली असून देशभरात एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्येही गेल्या चोवीस तासांमध्ये ३३६ ने भर पडली आहे. एकूण मृत्यू १२ हजार ५७३ झाले आहेत. 
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
राजधानीत सध्या २४२ नियंत्रित विभाग असून तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असून ७७ टक्के लोकांची वैद्यकीयदृष्ट्या पाहणी करण्यात आली असून २० जूनपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना नमुना चाचण्यांचे दर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आता मुंबईप्रमाणे दिल्लीतही नमुना चाचणी २४०० रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे. जलद निष्कर्षांसाठी रॅपिड अण्टिजिन चाचणीही सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com