फक्त १ रुपयात इडली! तीस वर्षांच्या 'ती'च्या सेवेला मुख्यमंत्र्यांचा सलाम

तीस वर्षांच्या काळात महागाईत प्रचंड वाढ झाली तरीही त्यांनी आपल्या इडलीच्या किंमतीत बदल केलेला नाही.
M Kamalthal_Idli
M Kamalthal_Idli

मदुराई : गेल्या ३० वर्षांपासून केवळ १ रुपयात इडली विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ८७ वर्षीय आजीबाईंचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते गुरुवारी गौरव करण्यात आला. या तीस वर्षांच्या काळात महागाईत प्रचंड वाढ झाली तरीही त्यांनी आपल्या इडलीच्या किंमतीत बदल केलेला नाही. (For thirty years she has been selling idlis for Re 1 Tamilnadu CM Stalin did honors)

एम कमलथल असं या आजीबाईंचं नाव असून कोईम्बतूर इथं आपल्या घरवजा दुकानात ते इडली विक्रीचा व्यवसाय करतात. या ठिकाणी जे लोक बाहेरगावहून येतात ज्यांना घरी जण्याचा पर्याय नसतो तसेच त्यांना स्वतःसाठी जेवण बनवणं शक्य नसतं अशा लोकांसाठी त्यांनी १ रुपयात इडली देतात.

M Kamalthal_Idli
Hijab Ban Case : हिजाब हा शाळेचा गणवेश नाही: सुप्रीम कोर्ट

इडलीसाठी लागणारी सामग्री जसं की, उडीद दाळ, भाजक्या डाळी, मिरची याच्या किंमतीत गेल्या तीस वर्षात मोठी वाढ झालेली असतानाही कमलथल या १ रुपयालाच इडली विकतात. दररोज त्या सुमारे ३०० लोकांना इडली विकतात. कोरोनाच्या काळातही सर्व महागलेलं असताना त्यांनी १ रुपयातच इडली विकली. या काळात आपल्या घरी इडलीसाठी रांग लागलेली असायची तेव्हा त्यांना सोशल डिस्टंसिंगचं पालन करायला लावून त्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवला.

M Kamalthal_Idli
Vedanta Project : वेदांताच्या प्रकल्पाची शेवटपर्यंत खात्री नसते - शरद पवार

कमलथल आजी म्हणतात की, जे लोक इतर ठिकाणांहून इथं येतात त्यांनी आपल्या जेवणाचं कसं करावं? मी त्यांच्यासाठी हे जेवण पुरवते. या आजीबाईंचे जे हितचिंतक आहेत ते त्यांना इडलीसाठी लागलणारं साहित्य आणि भाज्या आणून देतात. आजींच्या या कार्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कोरोनाकाळात त्यांची फोनवरुन विचारपूसही केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com