esakal | स्टरलाइट प्रकल्पात ऑक्सिजनची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Sterlite Project

स्टरलाइट प्रकल्पात ऑक्सिजनची निर्मिती

sakal_logo
By
वॉल्टर स्कॉट

चेन्नई - तमिळनाडूतील तुतीकोरीन येथील तीन वर्षांपासून बंद असलेला स्टरलाइट कॉपर प्रकल्प ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी अंशतः सुरू करण्यास राज्य सरकारने सोमवारी परवानगी दिली. ऑक्सिजन निर्मितीसाठी हा प्रकल्प चार महिने सुरू राहणार आहे.

सरकार नियुक्त समिती प्रकल्पातील ऑक्सिजन निर्मितीवर लक्ष ठेवणार असून तेथे कॉपरचे उत्पादन बिलकूल करता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. जनक्षोभाची दखल घेत तामिळनाडू सरकारने वेदांता ग्रुपचा हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी २०१८ मध्ये दिला होता. मात्र सध्या तमिळनाडूत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑक्सिजनसाठी हा प्रकल्प अंशतः सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखील आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने घेतला. बैठकीला सत्ताधारी अण्णाद्रमुक, द्रमुक, काँग्रेस, भाजप व डाव्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी स्टरलाइटने तमिळनाडूला मोफत ऑक्सिजन पुरवावा, अशी सूचना केली.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI

ज्या स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता, त्यांचा समावेश देखरेख समितीत केला जावा, म्हणजे या कारखान्यातील सर्व घडामोडींवर ते लक्ष ठेऊ शकतील, अशी सूचना द्रमुकच्या नेत्या आणि तुतीकोरीनच्या खासदार कनिमोळी यांनी केली.

बैठकीतील निर्णय

  • सर्वप्रथम तमिळनाडूची ऑक्सिजन गरज भागवावी

  • दररोज एक हजार ५० टन ऑक्सिजन निर्मितीसाठीच वीज

  • कोणत्याही स्थितीत कॉपर विभाग सुरू करता येणार नाही

loading image