OYO Hotel Crime : लोकप्रिय OYO हॉटेलात बंदुकीचा धाक दाखवत ग्राहकांना जबर मारहाण; गुन्हा दाखल

या घटनेमुळे OYO हॉटेलात जाणाऱ्या ग्राहकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
OYO Hotel
OYO Hotelsakal

OYO Hotel Crime : इतर हॉटेलच्या दरांपेक्षा या हॉटेल्सचे दर कमी असल्याने अनेकजण परगावी गेल्यानंतर OYO हॉटेलमध्ये वास्तव्यास थांबतात.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

OYO Hotel
Sania Mirza : नमस्कारा सानिया म्हणत RCB ने टेनिस स्टार सानियाला दिली मोठी जबाबदारी

मात्र, लोकप्रिय असलेल्या OYO हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांना रूममध्ये कोंडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप कुमार आणि विकास हे दोघे मित्र राजस्थानमधील बिलासपूर येथील दिल्ली-जयपूर महामार्गावर असलेल्या 'हॅपी स्टे ओयो' हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

OYO Hotel
Mukesh Ambani : रिलायन्स कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का! लोकांना माहिती न देताच बंद केली 'ही' सेवा

वरील दोघांनी 11 फेब्रुवारीरोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चेक-इन केले. त्यानंतर अचानक रात्री 11.30 च्या सुमारास वीज खंडित झाली.

रात्री एकवाजेपर्यंत लाईट न आल्याने या दोघांनी हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून सकाळपर्यंत लाईट येणार नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या ग्राहकांनी भरलेले पैसे परत मागितले असता हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. यात हॉटेल कर्मचाऱ्यांनी कुमार आणि विकास यांना मारहाण करत एका खोलीत बंद करत जबर मारहाण केली.

OYO Hotel
Viral Video : 'प्लिज मला नको खाऊस'.. ' हॉटेलात ताटातल्या माशानं चक्क चमचाच पकडला!

एवढेच नव्हे तर, सोनू, मोनू आणि राहुल नावाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवत निर्जनस्थळी नेत पुन्हा मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला.

कुमार आणि विकास यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 148, 323, 342, 365 आणि कलम 506 अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

OYO Hotel
Nikki Murder Case : मोबाईलची कॉर्ड, फ्रिजमध्ये लपवलेलं प्रेत, खुनानंतर लगेच लग्न; खुनाचा थरारक घटनाक्रम

दरम्यान, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून, सध्या सर्व आरोपी फरास आहेत. त्यांचा शोध घेतला जात असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे बिलासपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी राहुल देव यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com