
Viral Video : 'प्लिज मला नको खाऊस'.. ' हॉटेलात ताटातल्या माशानं चक्क चमचाच पकडला!
Fish Viral Video On Internet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं लाखो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात घडलेला किस्साही तसाच धक्कादायक आहे. तो प्रसंग पाहिल्यानंतर असे काही होऊ शकतो यावरही अनेकांना विश्वास ठेवणं कठीण होऊन गेले असणार हे असे वाटण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडिओला नेहमीच नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.
आता तर त्या व्हिडिओनं अवाक् होण्याची वेळ आली आहे. त्यात आपण पाहू शकतो की, एका ग्राहकानं हॉटेलमध्ये गेल्यानंतर फिश डिशची ऑर्डर केली. त्यानंतर थोड्यावेळानं त्याला वेटर फिशची डिश घेऊन आला, त्या डिशमध्ये दोन फिश होते. त्यानं जेव्हा ते मासे खाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या डिशमधील एका माशानं ग्राहकाच्या हातातील चमचाच ओढून घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी तो ग्राहकही घाबरून गेला.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आतापर्यत त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. फिश डिश आल्यानंतर तो ग्राहक चमचा त्या फिशच्या तोंडाजवळ नेतो. तेवढयात तो फिश चमचा तोंडात पकडतो. यानंतर त्या ग्राहकाला मोठा धक्काच बसल्याचे दिसून येते. फिशनं चॉपस्टिक पकडल्यानंतर त्या काही केल्या सोडल्याच नाहीत.
तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हॉटेलमध्ये अशा प्रकारे जिवंत मासेच सर्व्ह केले जातात की काय असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर मिळालेल्या प्रतिक्रियाही गंमतीशीर आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओच्या युझर्सनं तो शेयर करताना लिहिलं आहे की, त्या माशानं चॉपस्टिकच पकडली. त्यावर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, त्या हॉटेलातील फिश ही जरा जास्तच फ्रेश आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, पाहतोय हे खरं असेल तर हॉटेलमध्ये मासे खायचे की नाही...हा प्रश्न आहे.