भ्रष्टाचाराला हौतात्म्य देण्याचा प्रयत्न

चेन्नई - आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सत्यमूर्ती भवन येथे निदर्शने केली.
चेन्नई - आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सत्यमूर्ती भवन येथे निदर्शने केली.

नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ गैरव्यवहारातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सत्तारूढ पक्षाने स्पष्ट केले असून, अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला ‘हुतात्मा’ ठरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न निंदनीय असल्याचा पलटवारही केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशारा देऊन भाजपने जणू ‘रांगेत मागे बरेच जण आहेत,’ असेही सूचित केले आहे.

चिदंबरम यांची जामीन याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर तब्बल २७ तास ‘अदृश्‍यावस्थे’त असलेल्या चिदंबरम यांना सीबीआयने काल रात्री दहाच्या सुमाराला जोरबाग भागातील त्यांच्या आलिशान घरातून नाट्यमयरीत्या अटक केली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेला धिंगाणा, तपास अधिकाऱ्यांना कुंपणाची भिंत ओलांडून व आत उड्या मारून प्रवेश करावा लागणे, कार्यकर्त्यांचा गोंधळ त्यांच्याच घराच्या बाल्कनीतून सुहास्यवदनाने पहात असलेले काँग्रेस नेते या साऱ्या घटनाक्रमावर दिल्लीत जोरदार चर्चा आहे.

भाजपने मात्र या साऱ्या कारवाईशी सरकारचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले, की कायदा त्याचे काम करत आहे. न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. यात भाजप किंवा सरकारचा काहीही सहभाग नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कोठे ठेवायचे हे सरकार नव्हे तर न्यायालय ठरवते. चिदंबरम यांच्या बचावासाठी एकजूट झाल्याचे दाखवून पुढे आलेल्या काँग्रेसवर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

चिदंबरम यांना अटक करण्याची पद्धत निराशाजनक आहे. लोकशाही आक्रोश करत असतानाही न्यायव्यवस्था मदतीला येत नसल्याचे दिसत आहे. 
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com