चिदंबरम यांना न्यायालयाकडून दिलासा; अटक टळली

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

एअरसेल मॅक्‍सिस आणि आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी चिदंबरम यांनी न्यायालयांत याचिका केलेली आहे. आता पुढील सुनावणी दहा जुलैला होणार असून, त्याच दिवशी कार्ती चिदंबरम यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच दहा जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने आज (मंगळवार) सक्तवसुली संचनालयाला (ईडी) दिले. त्यामुळे चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी ईडी चिदंबरम यांना दहा जुलैपर्यंत अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आरोपी करण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून चिदंबरम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडी आज न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला. 

एअरसेल मॅक्‍सिस आणि आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी चिदंबरम यांनी न्यायालयांत याचिका केलेली आहे. आता पुढील सुनावणी दहा जुलैला होणार असून, त्याच दिवशी कार्ती चिदंबरम यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Web Title: P Chidambaram Cant Be Arrested Till July 10 In Aircel Maxis Case