P. Chidambaram: महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन नाही, तीन पायांचे जनावर सत्तेत; पी चिदंबरम यांचे टीकास्त्र

P. Chidambaram
P. Chidambaram

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे आणि फडणवीस करत असतात. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दावा करतात की त्यांचे सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. हे मला 100 मीटरच्या शर्यतीत धावणाऱ्या तीन पायांच्या जनावरासारखे वाटते. महाराष्ट्रातील नऊ नवीन मंत्र्यांना कोणतेही काम नाही कारण त्यांना खात्यांचे वाटप झाले नाही," असे पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.

चिदंबरम म्हणाले, "फडणवीसांसह इतर 20 मंत्र्यांपैकी कोणालाही कोणतेही खाते सोडायचे नाही. यावर उपाय आहे. नऊ नवीन मंत्री खात्याशिवाय मंत्री असतील, अशी घोषणा करा."

P. Chidambaram
Nawab Malik: नवाब मलिकांना झटका! हायकोर्टानं फेटाळला जामीन

अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) आठ आमदारांनी शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

अजित पवारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते, "आता डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन आहे. राज्य वेगाने विकासाच्या मार्गावर धावणार आहे. आता आपल्याकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे वेगाने विकास होण्यास मदत होईल. "

P. Chidambaram
Bacchu Kadu: बच्चू कडू मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, पण...; सरकारमध्ये राहण्याबाबतही स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com