प्रणवदा संघाला चुकांबद्दल समजवा - चिदंबरम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली - संघ व्यासपीठावर जाण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने मौन पाळले असले, तरी काँग्रेसचे नेते मात्र उघडपणे या कार्यक्रमाच्या विरोधासाठी पुढे सरसावले आहेत. पक्षांतर्गत राजकारणात प्रणव मुखर्जींचे कट्टर विरोधक मानले जाणारे पी. चिदंबरम यांनी ‘संघाला चुकीच्या विचारसरणीबद्दल समजवा’ असा सल्ला दिला आहे. तर कर्नाटक आणि केरळमधील काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहून विरोध व्यक्त केला आहे. 

काँग्रेसने या मुद्द्यावर अधिकृत भूमिका मांडताना ‘कार्यक्रम होत नाही तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही’ असा पवित्रा घेतला आहे. परंतु मुखर्जींसारख्या दिग्गज नेत्यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारण्यातून चुकीचा संदेश जाईल, असे काँग्रेस नेते खासगीत बोलत आहेत. तर प्रणवदा संघाला नक्कीच कानपिचक्‍या देतील, असेही काही नेते बोलत आहेत. 

एखाद्या कार्यक्रमातील भाषणावरून त्यांच्या विचारसरणीबद्दल अंदाज बांधण्याची गरज नाही, अशी टिपप्णी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली.

दुःखद निर्णय
प्रणवदांचे संघ व्यासपीठावर जाणे म्हणजे संघाला एकप्रकारे मान्यता देण्याचा आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेला दुबळे करण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसच्या एका गटाचे मानणे आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सी. के. जाफर शरीफ यांनी मुखर्जींना पत्र लिहून त्यांच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना संघाचे आमंत्रण नाकारावे, अशी मागणी केली. तर केरळ प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीथला यांनीही जाहीरपणे पत्र लिहून नाराजी मांडली आहे. जातीयवादी संघटनेच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय दुःख देणारा असल्याचे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

Web Title: p. chidambaram pranab mukherjee politics RSS Congress