Pachpadra Refinery Fire : राजस्थानात रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन

HPCL Pachpadra Project : उद्घाटनाच्या एक दिवस आधी आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्या तैनात करण्यात आल्या. या रिफायनरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.
Pachpadra Refinery Fire : राजस्थानात रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन
Updated on

राजस्थानमधील पचपदरा रिफायनरीमध्ये आग लागली आहे. या रिफायनरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार होते. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्यारवाना करण्यात आल्या आहेत. 'एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड'द्वारे उभारण्यात आलेली ही सुविधा, राजस्थानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला पहिलाच प्रकल्प आहे; जिथे 'BS-6' मानकांचे इंधन उत्पादित केले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com