Padma Award Rules: पद्म पुरस्कार परत केल्यानंतर तो रद्द होतो का? काय सांगतो नियम

कुस्ती महासंघावर भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या निकटवर्तीयाची नियुक्ती झाल्याने आणि महिला कुस्तीगीरांचे समर्थन म्हणून बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे.
Padma Award Rules
Padma Award Rules

नवी दिल्ली- ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनिया याने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. कुस्ती महासंघावर भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या निकटवर्तीयाची नियुक्ती झाल्याने आणि महिला कुस्तीगीरांचे समर्थन म्हणून बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. पण, पुरस्कार विजेता व्यक्ती आपला पद्म पुरस्कार परत करु शकतो का? आणि असं केल्यास त्याचा हा पुरस्कार रद्द होतो का? याबाबत नियम काय (Padma Award Rules) आहे हे आपण जाणून घेऊया.

पद्म पुरस्कार परत करणारा बजरंग पुनिया हा पहिला व्यक्ती नाही. याआधीही अनेकांनी आपला पुरस्कार परत केला आहे. असे असले तरी बजरंग पुनियाचे नाव पुरस्कार विजेत्याच्या यादीत कायम राहील. कारण, पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे पूनियाने पुरस्कार परत केला असला तरी त्याचे नाव पुरस्कार विजेता म्हणून कायम राहील.

Padma Award Rules
Bajrang Punia : मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत पाठवतोय... बजरंग पुनियानं उचललं टोकाचं पाऊल

टाईम्स ऑफ इंडियाने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. पुरस्कार जिंकलेला व्यक्ती केव्हाही आपला पुरस्कार परत करु शकतो. यासंदर्भात नियमांमध्ये कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, राष्ट्रपतींनी सांगितलं तरच कोणत्याही कारणाशिवाय पद्म पुरस्कार रद्द केला जाऊ शकतो.

राष्ट्रपतींनी रद्द करेपर्यंत विजेत्याचं नाव पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत कायम राहील. आतापर्यंतच्या इतिहासात पद्म पुरस्कार रद्द करण्यात आल्याची कोणतीही घटना घडली नाही. देशाच्या तपास यंत्रणा यांच्याकडून व्यक्तीच्या चरित्राची पडताळणी केली जाते. सत्यता तपासल्यानंतरच व्यक्तीला पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.

Padma Award Rules
भाजपमध्ये गटबाजी : वसुंधरा राजे करणार शक्तिप्रदर्शन; पुनिया कॅम्प निशाण्यावर?

पद्म पुरस्कार देण्याच्या आधी याबाबतची औपचारिक माहिती संबंधित व्यक्तीला देण्यात येते. अनेकांनी पुरस्कार घेण्याच्या आधीच तो नाकारला आहे. व्यक्तीला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आल्यानंतर त्याचे नाव भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात येते. पुरस्कार विजेत्यांची वेगळी नोंद ठेवली जाते. व्यक्तीने पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे नाव रजिस्टरमधून कमी केले जात नाही.

याआधी कोणी केलंय पद्म पुरस्कार परत?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि माजी केंद्रीय मंत्र एसएस ढींडसा यांनी आपले पद्म पुरस्कार परत केले होते. त्यांनी २०२० मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ही कृती केली होती. त्यांनी यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. असे असले तरी त्यांचे नाव पुरस्कार विजेत्यांच्या यादीमधून वगळण्यात आलेलं नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com