esakal | प्रसिद्ध शास्रीय गायक राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

प्रसिद्ध शास्रीय गायक राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

पद्म भूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे रविवारी निधन झालं.

प्रसिद्ध शास्रीय गायक राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - पद्म भूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे रविवारी निधन झालं. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी पंडित राजन मिश्रा यांना छातीत दुखायला लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

राजन मिश्रा हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्यांना 2007 मध्ये भारत सरकारने कलाक्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने गौरवलं होतं. बनारस घराण्याचे असलेल्या राजन यांनी 1978 मध्ये त्यांचा पहिला संगीत कार्यक्रम श्रीलंकेत केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंडसह अनेक देशांमध्ये कार्यक्रम केले होते.

हेही वाचा: दिल्लीत परिस्थिती हाताबाहेर; लॉकडाऊन पुन्हा वाढवला

राजन आणि साजन मिश्रा अशी दोन भावांची जोडी प्रसिद्ध होती. दोघेही एकत्र कार्यक्रम सादर करायचे. जगभरात राजन-साजन जोडीने नावलौकिक मिळवला होता. पंडित राजन आणि साजन मिश्रा यांचे असे म्हणणे होते की, जसं मानवाचं शरीर पंचतत्वांपासून बनतं तसचं संगीताचे सात सूर हे पशु पक्ष्यांच्या आवाजातून तयार कऱण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी दोघांनीही असं म्हटलं होतं की, आपत्तीसाठी निसर्ग नाही तर आपण जबाबदार आहोत. आपण मानसिकता बदलून निसर्गाला साथ द्यायला हवी असंही त्यांनी म्हटलं होतं.