चीनच्या एजंटला भारताकडून पद्मश्री; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

या दाव्यामुळे भारत सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता.
Barry Gardiner
Barry Gardiner Team eSakal

लंडन : ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 ने एक मोठा दावा केला आहे. हा दावा युकेच्या एका खासदाराशी संबंधित आहे. मात्र, यामुळे भारत सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. MI5 ने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर (Barry Gardiner) हे चिनी एजंट असल्याचा आरोप केला आहे. भारतासाठी महत्वाची बाब म्हणजे जानेवारी-2020 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने बॅरी गार्डनर यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

Barry Gardiner
भारत चीन सीमावाद : सैन्य माघारीबाबत ठोस निष्कर्ष नाही

MI5 आरोप केला आहे की, बॅरी गार्डिनर यांनी ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी चीनकडून पैसे घेतले. या कामासाठी चीनच्या क्रिस्टीन चिंग कुई ली या लॉ फर्ममार्फत गार्डिनरच्या कार्यालयात बराच काळ पैसे पाठवले जात होते. क्रिस्टीनच्या फर्मची लंडन आणि बर्मिंगहॅममध्येही कार्यालयं आहेत. त्यांची फर्म लंडनमधील चिनी दूतावासात कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करते. एवढेच नाही तर बॅरी गार्डनरने क्रिस्टीनचा मुलगा डॅनियल विल्कीस यालाही त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. मात्र, MI5 चा खुलासा झाल्यानंतर डॅनियलने गुरुवारी तेथून राजीनामा दिला.

काय आहे क्रिस्टीन?

MI5 नुसार क्रिस्टीन ही एक चिनी गुप्तहेर आहे. ती चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना च्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट (UFWD) साठी काम करते. UFWD च्या आदेशानुसार, ती ब्रिटनमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि अस्थिरता निर्माण करण्याचं काम करते. चीनच्या हिताची धोरणं आणि निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. MI5 नुसार, बॅरी गार्डिनर हे एकमेव नाही ज्यानं चीनकडून पैसे घेतले. क्रिस्टीनने त्यांच्या लॉ फर्मद्वारे इतर पक्षांना आणि त्यांच्या खासदारांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे. या दाव्यासोबतच गुप्तचर संस्थेने सर्व पक्ष आणि खासदारांना चिनी हस्तक्षेपाविरोधात इशाराही दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com