'पद्मावत'वरुन मॉलमध्ये जाळपोळ

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जानेवारी 2018

अहमदाबाद - सर्वोच्च म्यायालयाच्या निर्णयानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट 'पद्मावत' हा 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आणखी तीव्र झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये श्री करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. यामध्ये सुमारे दीडशे दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  मॉलमध्ये अडकलेल्या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली असून, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अहमदाबादमधील करणी सेनेच्या नेत्यांनी मात्र या तोडफोडीचा संघटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली असून, 'आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. पण कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच' असे त्यांनी सांगितले. 

गुजरात सरकारने पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता. असे असले तरी राज्यातील चित्रपटगृह मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पटेल यांनी दिली.

Web Title: Padmaavat release: Ahmedabad malls vandalised, vehicles set on fire