सहानुभूती नको; रोजगार द्या - पद्मश्री शेखर नाईक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बेळगाव - अंध खेळाडूंना सहानूभुती नको तर सरकारने रोजगार द्यावा, अशी अपेक्षा भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक यांनी व्यक्त केली. जितो संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

बेळगाव - अंध खेळाडूंना सहानूभुती नको तर सरकारने रोजगार द्यावा, अशी अपेक्षा भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक यांनी व्यक्त केली. जितो संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

नाईक म्हणाले, ‘‘अंध-अपंग खेळाडूंच्या जीवनात भक्कम आर्थिक आधार हवा. त्यासाठी कर्नाटक सरकारने केरळच्या धर्तीवर त्यांना सरकारी रोजगार उपलब्ध करुन द्यावा. रोजगार प्राप्त झाल्यास त्यांना मानसिक, आर्थिक स्थैर्य तर मिळेलच, त्याशिवाय त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. कर्नाटकात १६ हून अधिक अंध क्रिकेट संघ आहेत. त्यांच्या सदस्यांना रोजगार द्यावा. या संदर्भात आपण स्वतः सिद्दरामय्या मुख्यमंत्री असताना सरकारला प्रस्ताव सादर केला होता. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना याबाबत निवेदन देणार आहे.
जितोच्या युवा शाखेने कर्नाटकात प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर खेळाडू लिलाव आणि संघमालकीच्या प्रकाराची बहुतेक सर्व क्रीडाप्रकारांची स्पर्धा आयोजित केली आहे. सर्वच खेळांना व्यासपीठ मिळाले आहे. जितोची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे नाईक म्हणाले.

बेळगावशी जिव्हाळ्याचे नाते
आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेटस्पर्धा खेळण्यापूर्वी बेळगावात झालेल्या चाचणीत आपण नाबाद २४९ धावा केल्या होत्या. त्यामुळेच माझी आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेटस्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामुळे बेळगावशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. बेळगावच्या मनातीत सक्षम खेळाडू बनविण्याची क्षमता, ऊर्जा आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Padmashri Shekhar Naik comment