
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आता पर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी पार्टीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे- पाटीलही जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबासोबत पर्यटनाला गेल्या होत्या त्याही तिथे अडकल्या आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत तेथील परिस्थिती सांगितली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे.