
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल पुरावे पाकिस्तानशी जोडलेले असल्याचे दिसून येत आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे की हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे डिजिटल फुटप्रिंट मुझफ्फराबाद आणि कराचीमधील सेफ हाऊस पर्यंत पोहोचत आह. यावरून या हल्ल्याच्या सीमेपलिकडील संबंधाचे पुरावे मिळतात. या हल्ल्यात आतापर्यंत २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 12 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.