कोलकता - अमेरिकेत राहणारे मूळचे पश्चिम बंगालमधील बितन अधिकारी (वय-४०) हे सुट्टी घेऊन काही दिवसांपूर्वीच कोलकत्याला आले होते. ‘टीसीएस’मध्ये अभियंता असलेले अधिकारी यांच्याबरोबर त्यांची पत्नी सोहिनी (वय-३७) व तीन वर्षांचा मुलगा रिधान हेही होते. १६ एप्रिलला काश्मीरला ते गेले होत. गुरुवारी (ता.२४) तेथून परतण्याचे त्यांचे नियोजन होते. पण पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बितन अधिकारींचा मृत्यू झाला.