

Jammu Kashmir terror attack: काश्मिरातल्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश काढण्यात आले.