जम्मू : जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terror Attack) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांचा खात्मा केला जाईल. त्यांच्याकडे जगण्यासाठी फार वेळ उरलेला नाही,' असे ठाम वक्तव्य सिन्हा यांनी केले.