
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता दहशतवादविरोधी संस्था राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हाती घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआएने या प्रकरणात औपचारिक कारवाई सुरू केली आहे. तपास यंत्रणेला सुरुवातीच्या तपासात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. बुधवारी पासून एनआयएचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे आणि त्यांनी पुराव्यांचा शोध वेगाने सुरु केला आहे.