UNSC Report on Pahalgam Terror Attack : TRF आणि लष्कर यांच्यात खोल संबंध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दोन्ही संघटना एकमेकांना पूरक असल्याचं निरीक्षण अहवालात मांडण्यात आलंय.
Pahalgam Terror Attack : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या निर्बंध देखरेख पथकाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.