आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकचे बंकर्स उद्धवस्त ; बीएसएफची कारवाई

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करण्यात येत आहे.

जम्मू : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तान रेंजर्सने हा गोळीबार थांबविण्याची विनंती केली. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकचे बंकर्स उद्धवस्त करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले. 

पाकिस्तानी सैन्याने जम्मू येथील सीमा सुरक्षा दलाला सांगितले, की आंतराराष्ट्रीय सीमा रेषेवर सुरु असलेला गोळीबार थांबवावा, अशी विनंती केल्याचे सीमा सुरक्षा दलाने सांगितले, याबाबतची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मागील काही दिवसांपासून अंदाधुंद गोळीबार केला जात होता. हा गोळीबार थांबविण्याची विनंती पाकिस्तानने सीमा सुरक्षा दलालाकडे केली.

Web Title: Pak bunkers busted assets destroyed by BSF troops along International Border