पाकने कृतीतून शांतताप्रिय असल्याचे दाखवावे : भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असल्याचे वक्तव्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर "शांतताप्रिय देश असल्याचे पाकिस्तान आपल्या कृतीतून सिद्ध करावे', अशी सूचना भारतीय जनता पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, "पाकिस्तान शांतताप्रिय देश असू शकतो. मात्र त्यांनी ते कृतीतून दाखवून द्यावे. दहशतवाद्यांना पोसणे, भारतात दहशतवादी पाठवणे, दहशतवाद्यांचे तळ बंद न करणे, दहशतवाद्यांना मुक्त संचार करू देणे, 26/11 हल्ल्याबाबत कारवाई न करणे या साऱ्या कृत्यांमधून पाकिस्तान शांतताप्रिय देश असल्याचे दिसत नाही.' पाकिस्तान जर शांतताप्रिय देश असल्याचा दावा करत असेल तर त्यांनी दहशतवादाला पोसणे बंद करावे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, असेही कोहली पुढे म्हणाले.

अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी पाकिस्तानने इतर देशांसोबत विशेषत: शेजारी देशांच्या बाबतीत सतत मैत्रीपूर्ण धोरण अवलंबिले आहे, असे वक्तव्य केले होते.

Web Title: Pak through its action should show that it's peace loving nation : BJP