'पाक नवीन नोटेची नक्कल करू शकत नाही'

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या 500 व 2000 रुपयांच्या नोटेची पाकिस्तान व तेथील गुन्हेगारी संघटना नक्कल करू शकत नाही, असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.

भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या नोटांची नक्कल होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे. यामुळे पाकिस्तानला व तेथील गुन्हेगारी संघटनांना नव्या नोटांची नक्कल करणे अवघड होणार आहे, असे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भारतीय नोटांची सर्वाधीक छपाई होते. या नोटांमध्ये 500 व 1000च्या नोटांचा मोठा सहभाग होता. परंतु, भारत सरकारने 500 व 1000च्या नोटा बंद केल्यामुळे छपाई केलेल्या नोटांबाबत पाकची मोठी पंचाईत झाली आहे, असेही गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

Web Title: Pak won't be able to copy new notes