'आयईडी' स्फोटात हुतात्मा झालेल्या मेजरचे होते 7 मार्चला लग्न 

Chitrsh Bisht
Chitrsh Bisht

जम्मू : जम्मू-काश्‍मीरच्या राजोरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ आज झालेल्या 'आयईडी'च्या स्फोटात लष्कराचा एक अधिकारी हुतात्मा झाला, तर एक जवान जखमी झाला. चित्रेश बिश्त असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांचा 7 मार्चला विवाह होणार होता.

नौशेरा विभागात ही घटना घडली. लष्कराचा हा अधिकारी जवानांसोबत गस्त घालत असताना हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर जानेवारीपासून झालेला हा दुसरा 'आईडी' स्फोट आहे. नुकतेच पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 44 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर लगेच हा हल्ला झाला आहे.

मुळचे उत्तराखंडमधील टिहरी गावचे रहिवाशी असलेल्या चित्रेश यांचा 7 मार्चला अंकिताशी विवाह होणार होता. त्यापूर्वीच ते स्फोटात हुतात्मा झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मेजश चित्रेश हे 2009 मध्ये आयएमएमधून पासआऊट झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com