"पाक-चीन मिळून कटकारस्थान रचतायेत; जवानांनो आपल्याला सतर्क रहायचय"

BSF, China, Pakistan, India, loc
BSF, China, Pakistan, India, loc

श्रीनगर : चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात कटकारस्थान रचत आहेत, असे सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) चे महासंचालक राकेश अस्थाना यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलणाऱ्या अस्थाना यांनी राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सीमारेषेवर फ्रंटलाइनला सज्ज असलेल्या जवानांशी संवाद करताना त्यांनी पाक-चीन भारताविरोधात कुरापती करत असल्याचा आरोप केला आहे.

नियंत्रण रेषेवरील 744 किलोमीटर परिचालनाची कमान ही लष्कराकडे आहे. बीएसएफला देखील लष्कराच्या साह्यतेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. बीएसएफ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांनी पुंछ आणि राजौरी सेक्टरमधीस वेगवेगळ्या भागाची पाहणी केली. रजौरी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) आय डी सिंह आणि एलओसीवर तैनात फील्ड कमांडर अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणि तयारीसंदर्भातील माहिती बीएसएफच्या महासंचालकांना दिली. सुरक्षेसंदर्भातील आव्हान प्रभावीपणे पार पाडायचे आहे, या बाबींवर महासंचालक अस्थाना यांनी अधिक जोर दिला.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अस्थाना यांनी जम्मू कॅम्पमध्ये आयोजित सैनिक संम्मेलनामध्ये जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उत्कृष्ट ताळमेळ आणि अनुशासन उच्चस्तरावर कामय ठेवण्याचे आवाहन जवानांना केले. पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे  भारताविरोधात कटर आखत आहेत. त्यामुळे सीमारेषेवर बीएसएफची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.  सध्याची परिस्थिती सर्वांसाठी कसोटीची असून हा काळ आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या शेजारील देश भारताविरोधात कटकारस्थान आखत आहेत. त्यांचे इरादे उधळून लावण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे, असे बीएसएफ महासंचालकांनी म्हटले आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com