कैदी पलायनामागे पाकिस्तानचा हात : सुखबीरसिंग

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

चंडीगड - नाभा कारागृहामधून कैद्यांच्या पलायनामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या "सर्जिकल स्ट्राइक'नंतर शेजारील देश दहशतवाद पुन्हा सुरू करण्यासाठी जिवावर उदार झाला असल्याचेही बादल यांनी सांगितले.

चंडीगड - नाभा कारागृहामधून कैद्यांच्या पलायनामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या "सर्जिकल स्ट्राइक'नंतर शेजारील देश दहशतवाद पुन्हा सुरू करण्यासाठी जिवावर उदार झाला असल्याचेही बादल यांनी सांगितले.

याबाबत बादल म्हणाले की, ""भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यामुळे पुन्हा दहशतवाद पसरविण्याचा त्यांचा हेतू आहे. नाभा कारागृहातील कैद्यांच्या पलायनामागेही त्यांचा हात असावा, असे ते म्हणाले. राज्य सरकार याप्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पोलिस कायदा सुव्यवस्था राखत दहशतवादी व गुंडांमधील गुन्हेगारी कटाबाबत तपास करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पंजाबचे उपमुख्यमंत्री बादल यांनी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रेणेचे (एनएसए) सल्लागार अजित दोवाल यांच्याशी चर्चा करून त्यांना सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी "एनएसए'ला वेळोवेळी आवश्‍यक घडामोडी कळविण्यात येतील, अशी माहितीही बादल यांनी दिली. याचप्रमाणे केंद्रीय गृहसचिव राजीव मिश्रा यांनीही पंजाबचे पोलिस महासंचालकांशी या घटनेबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

केंद्राने अहवाल मागविला
नवी दिल्ली : पंजाबमधील नाभा कारागृहातून खलिस्तानी अतिरेकी हरमिंदर मिंटू आणि इतर पाच कैदी फरारी झाल्याप्रकरणी केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे अहवाल मागविला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पंजाब सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल मागविला आहे. राजनाथसिंह सध्या हैदराबाद येथे असून, येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी झालेल्या 15 मिनिटांच्या चर्चेमध्ये त्यांनी सविस्तर वृत्तांतही जाणून घेतल्याचे सांगितले.

Web Title: Pakistan behind escape of Prisoners : Sukhbirsingh