Pakistan Delegation India Visit
esakal
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) पहिल्या ‘सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला ताजमहाल पाहण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. मात्र, दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.