पाक उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

मोहम्मद अख्तरवर पाळत ठेवत असल्याचा आरोप असून, लष्कराशी संबंधित नकाशे व महत्त्वाची कागदपत्रे अख्तरकडे सापडली आहेत.

नवी दिल्ली - गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी पाक उच्चायुक्तालयतील कर्मचारी मोहम्मद अख्तर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनाही समन्स बजाविण्यात आले आहे.

पाक उच्चायुक्तामधील कर्मचारी अख्तरची चाणक्यपुरी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने बैठक बोलाविली आहे. मोहम्मद अख्तरवर पाळत ठेवत असल्याचा आरोप असून, लष्कराशी संबंधित नकाशे व महत्त्वाची कागदपत्रे अख्तरकडे सापडली आहेत.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयी सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांना दिली आहे. 

Web Title: Pakistan High Commission staffer arrested for allegedly possessing defence documents