पाकच्या गोळीबारामुळे राजौरीत 71 शाळा बंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सार्वजनिक सुरक्षेसाठी अन्य उपाययोजनाही करण्यात आल्याची माहिती येथील पोलिस उपायुक्त शाहिद चौधरी यांनी दिली. पाकिस्तानकडून या भागांत कालपासून गोळीबार करण्यात येत असून नागरी वसाहतीस विशेषत्वे लक्ष्य करण्यात आले आहे. या भागातील झांगर, धामका आणि कलाल पट्टी या गावांना पाकच्या गोळीबाराचा फटका बसला आहे

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील नौशेरा (राजौरी जिल्हा) येथील लाम भागामध्ये पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या प्रचंड गोळीबारामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत असल्याने या भागातील 71 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक सुरक्षेसाठी अन्य उपाययोजनाही करण्यात आल्याची माहिती येथील पोलिस उपायुक्त शाहिद चौधरी यांनी दिली. पाकिस्तानकडून या भागांत कालपासून गोळीबार करण्यात येत असून नागरी वसाहतीस विशेषत्वे लक्ष्य करण्यात आले आहे. या भागातील झांगर, धामका आणि कलाल पट्टी या गावांना पाकच्या गोळीबाराचा फटका बसला आहे.

भारतीय लष्कराकडूनही पाकच्या या आगळिकीस चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Web Title: pakistan jammu kashmir indian army