esakal | पाकिस्तानमध्ये काश्मीरवर सुरु होती Online मीटिंग, हॅकर्सनी दिला 'जय श्रीराम'चा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

pak live zoom meeting hacked

काश्मीर प्रश्नावर सुरु असलेल्या एका ऑनलाईन सेमिनारला हॅक करुन भारतीय हॅकर्सनी जय श्रीरामचे नारे दिल्याची घटना समोर आली आहे.

पाकिस्तानमध्ये काश्मीरवर सुरु होती Online मीटिंग, हॅकर्सनी दिला 'जय श्रीराम'चा नारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जम्मू काश्मीर हा भाग नेहमीच वादग्रस्त राहीला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत या प्रदेशावरुन नेहमीच तणावाचे वातावरण राहीलेले आहे. या प्रदेशावर पाकिस्तानने नेहमीच आपला दावा सांगितला आहे. येनकेन प्रकारे या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच कुरघोड्या करत असतो. या भागाचे सौंदर्य नेस्तनाबूत करुन रक्तरंजीत काश्मीरची अवस्था ही पाकिस्तानच्या कुटील डावांमुळेच झाली आहे. मात्र आता काही भारतीय हॅकर्सनी याबाबत एक चांगलेच  प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर प्रश्नावर सुरु असलेल्या एका ऑनलाईन सेमिनारला हॅक करुन भारतीय हॅकर्सनी जय श्रीरामचे नारे दिल्याची घटना समोर आली आहे. या सेमिनारमध्ये काश्मीर प्रश्नावर चर्चा सुरु होती. 

हेही वाचा - माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे दुसऱ्यांदा बोहल्यावर; ब्रिटिश मैत्रिणीसोबत थाटला संसार

'भारतव्याप्त काश्मीरची 72 वर्षे' असं या सेमिनारचे नाव होते. झूम या ऍप्लिकेशनवर हे सेमिनार आयोजित केले होते. यामध्ये पाकिस्तानचे काही अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पाकिस्तानच्या काही व्यक्तींनी हा सेमिनार आयोजित केला होता. 

या ऑनलाईन वेबिनारमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांची जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चर्चा सुरु होती. या व्हिडीओ कॉन्फरंसिगमध्ये रामाची गाणी ऐकू येत होती. सुरवातीला हनुमानाचे गाणे लागले आणि त्यानंतर मग श्रीरामाचेही गाणे लागले. यामध्ये त्या हॅकर्सचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता. 'एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम'  अशा घोषणाही देण्यात आल्या. 

हेही वाचा - हवं तर भाजपला मत देऊ पण 'सपा'ला चारीमुंड्या चित करु; मायावती अखिलेशवर संतापल्या

यामुळे सैरभैर झालेल्या सेमिनारच्या सदस्यांना काहीच कळेनासे झाले. त्यांना वाटलं की, सेमिनारचे आयोजक डॉ. वलीद मलिक यांच्याकडून हे गाणे सुरु झाले. म्हणून त्यांनी हे गाणे बंद करायलाही सांगितले. 
यानंतरही अधूनमधून 'आम्ही हिंदुस्थानी आहोत, तुम्ही रडत बसा, जय श्रीराम' अशापद्धतीचे नारे ऐकू येत होते. या एकूण प्रकाराची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याआधी भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानच्या विद्यापीठांच्या वेबसाईट हॅक केल्याची घटनाही समोर आली होती. 

काश्मीर प्रश्नावरुन भारत आणि पाकिस्तानदरम्यान सतत वाद राहिलेले आहेत. याबाबत पाक नेहमीच उद्दाम वागत आला आहे. 

loading image
go to top