पाकचा "एलओसी'जवळ गोळीबार;जीवितहानी नाही

पीटीआय
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

जम्मु - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मु काश्‍मीर राज्यामधील अखनूर जिल्ह्यामधील नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल पाच वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे.

""पल्लनवाला, चाप्रियाल आणि समनम भाअगांमध्ये पाकिस्तानकडून छोट्या शस्त्रांच्या सहाय्याने मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. रात्री साडेबारा वाजता सुरु करण्यात आलेला हा गोळीबार तासभर चालला. या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही,‘‘ असे जम्मुचे उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. याआधी, काल (गुरुवार) पाकिस्तानकडून मेंढर सेक्‍टरमधील बलनोई येथे गोळीबार करण्यात आला होता.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

Web Title: Pakistan "LOC" By firing; no mortality