भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानी लष्कराचे सहकार्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन- काश्मिरप्रश्न धगधगता ठेवण्यासाठीच भारतातील दहशतवादी हल्ल्यांना पाक सैन्य मदत करत असल्याचे दक्षिण आशियाई तज्ञांच्या एका गटाने तयार केलेल्या अहवालात नमुद केले आहे.

पाक सैन्य या दहशतवाद्यांना मदत करुन काश्मिर प्रश्नाकडे जगाचे वेधण्याचा प्रयत्न करते.काश्मिर मधील अशांतता ही पाकिस्तानची गरज आहे.त्यामुळे या पाक पुरस्कृत दहशतवादी कारवाया दोन्ही देशांच्या सरकार तर्फे शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना फोल ठरविण्याचा प्रयत्न आहे असे या अहवालात सांगितले आहे.

पाकिस्तानची वाढणारे अण्वस्त्र सामर्थ्य आणि अद्ययावत क्षेपणास्त्रे ही भारतासह संपुर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे.याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या अहवालात आहे.

या अहवालानुसार, पाकने गेल्या कित्येक वर्षांपासुन दहशतवादी गटांना पाठबळ देण्याचे धोरण अवलंबले आहे.या दहशतवादी गटांना पाकिस्तानात आश्रय दिला जातो.या गोष्टीचा पाकिस्तानला ही तितकाच त्रास होतो.मागील काही वर्षांमध्ये या दहशतवाद्यांकडुन पाक मध्ये झालेल्या हल्ल्यांत अनेक पाक नागरिक बळी पडले आहेत.

Web Title: Pakistan military supports terror groups against India: report