Pakistan Minister India Visit
esakal
पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. गेल्या तीन वर्षांत भारतात येणारे ते पहिले पाकिस्तानी मंत्री आहेत. मात्र, या दौऱ्यात त्यांनी आग्र्यातील ताजमहाल आणि दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण भारत सरकारने त्यांच्या या मागणीला परवानगी दिलेली नाही. त्यांना केवळ एससीओच्या कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणीच जाण्याची मुभा देण्यात आली आहे.