Pakistan Aamir Liaquat I पाकमधील खासदाराच्या तिसऱ्या पत्नीने मागितला घटस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकमधील खासदाराच्या तिसऱ्या पत्नीने मागितला घटस्फोट

काही महिन्यांपूर्वी आमिर लियाकतने त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी लग्न केले होते.

पाकमधील खासदाराच्या तिसऱ्या पत्नीने मागितला घटस्फोट

पाकिस्तानातील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि माजी मुख्यमंत्री इमरान खान यांच्या पक्षातील खासदार आमिर लियाकत यांच्या पत्नी सैयदा दानिया शाह हिने घटस्फोटासाठ मागितला आहे. यासाठी तिने या खासदार पतीविरोधात न्यायलयात अर्ज दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर लियाकतने त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी लग्न केले होते. मात्र आता हे लग्न तुटण्याच्या मार्गावर असून मेहेर (पोटगी) म्हणून दानियाने आमिरकडे १५ कोटी रुपये आणि एका आलिशान घरासह दागिन्यांची मागणी केली आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वीच अमीर लियाकतची दुसरी पत्नी तुबा अन्वरने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्याने तिसऱ्या लग्नाची घोषणा केली होती. वय वर्ष 49 असणाऱ्या अमीर लियाकतवर आता 18 वर्षीय पत्नी सैयदा हिने गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये आमिर लियाकत हा सैतानपेक्षाही वाईट असल्याचं तिने या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा: कृपाशंकर यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती

पाक मीडियाशी बोलताना दानिया म्हणाली, आज मी आमिर लियाकतपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात गेले होते. बाकीची सर्व माहिती तुम्हाला बातम्यांद्वारे मिळेल. त्याने मला सांगितल्याप्रमाणे एकही वचन पूर्ण केलेले नाही. लग्न करताना त्याने मला पुढे शिकवण्यासाठी वचन दिले होते. मात्र त्याने कोणत्याही अटीचे पालन केलं नसुन वारंवार माझा अपमान केला आहे, असल्याचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे.

आता दानिया काय म्हणते व्हिडिओत?

आमिर लियाकत टीव्हीवर दिसतो तसा नाही. तो सैतानापेक्षा वाईट आहे. आमिर तिला मद्यधुंद अवस्थेत मारहाण करतो आणि खोलीत कोंडून ठेवतो. इतकेच नाही तर आमिरने तिला आणि तिच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप तिने केला आहे. या साऱ्या गोष्टींना कंटाळून आता आमिर लियाकतच्या तिसऱ्या पत्नीने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात

Web Title: Pakistan Mp And Tv Host Aamir Liaquat Third Wife Daniya Demand Of Talaq

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top