Ashish Shelar | BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Shelar News | BMC News

'दाऊदच्या गुंडांकडून वसुलीचे काम सुरू असून ही कारवाई राज्यातील पोलिसांनी का केली नाही?'

BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात

राज्याचे पोलिस हनुमान भक्तांना पकडतात. केंद्रीय यंत्रणा अवैध कामांवर कारवाई करतात, म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई केली जाते. मुबंई महापालिका अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत एकही शब्द काढत नाही किंवा कारवाई करत नाही. त्यामुळे मुंबई महापालिका ही आडनाव बघून कारवाई करते असा घणाघात भाजपाचे नेते अशिष शेलार यांनी केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते. (Ashish Shelar alleges on BMC)

हेही वाचा: धाड टाकलेल्या घरात आढळली ३० कोटींची रोकड, ६ कोटींवर पोलिसांचा डल्ला?

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधते शेलार म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची दशा आणि दिशा चुकली आहे. मुंबई महापालिकेकडून आडनाव पाहून कारवाई केली जात आहे. शेख, पठाण यांना महापालिकेने कधीही नोटीस पाठवल्या नाहीत. मात्र राणेंना नोटीस पाठवली आहे. महापालिकेकडून शेख, पठाण यांच्या अनिधिकृत बांधकामांवर कधीही कारवाई झालेली नाही. राणे यांच्या घरावर कारवाई झाली आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका कधी कारवाई करणार आहे असा सवालही शेलार यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, राज्यातील सध्याची शिवसेना मराठीचा मुद्दा विसरून गेली आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाची संबंध संपला आहे, अशी जहरी टीकाही शेलारांनी केली आहे. एनआयएच्या कारवाई संदर्भात ते म्हणाले, एनआयए दाऊदशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत आहे. मागील काही वर्षात अशी कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात हा फरक आहे असंही ते म्हणाले आहेत. दाऊदच्या गुंडांकडून वसुलीचे काम सुरू असून ही कारवाई राज्यातील पोलिसांनी का केली नाही? असा सवालही शेलारींनी यावेळी केला आहे.

हेही वाचा: कृपाशंकर यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती

Web Title: Ashish Shelar Criticized On Bmc And Maha Vikas Aghadi Govt On Nia Raids Dawood Relative People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top