इम्रान खान यांनी राखली सत्ता; जिंकला विश्वासदर्शक ठराव!

imran-khan
imran-khan

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी संसदेत सत्ता वाचवण्याच्या मोठ्या परीक्षेत यश मिळवलं. सुमारे तसाभर चाललेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान इम्रान खान सरकारच्या समर्थनार्थ १७८ मतं पडली, विजयासाठी त्यांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये १७२ मतांची गरज होती. या मतदानानंतर नॅशनल असेम्ब्लीच्या सभापतींनी इम्रान खान यांची खुर्ची सुरक्षित असल्याची घोषणा केली.

धोक्याची घंटा ! जगातील दोन देशांमध्येच आहेत 30 टक्के नवीन रुग्ण

सिनेटच्या निवडणुकीतील पराभवाच्या झटक्यानंतर इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठरावाची घोषणा केली होती. मात्र, विरोधीपक्षानं यावर बहिष्कार घातला होता. संसदेत जेव्हा इम्रान खान मतदानासाठी तयार होत होते, तेव्हा बाहेर विरोधीपक्षांची पत्रकार परिषद सुरु होती. यामध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या समर्थकांवर टीका करण्यात आली. दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांनी संसदेबाहेर एकत्र आलेल्या विरोधी पक्षांविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी आणि पीएमएल-एनच्या दुसऱ्या नेत्यांसोबत यावेळी त्यांनी धक्काबुक्कीही केली. 

Corona Vaccine सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवा, निवडणूक आयोगाचा आदेश

स्वेच्छेने विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणारे इम्रान खान दुसरे पंतप्रधान

इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील असे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वेच्छेने नॅशनल अमेम्ब्लीत विश्वासदर्शक ठरावाचा सामना केला. यापूर्वी नवाज शरीफ यांनी सन १९९३ मध्ये स्वेच्छेने विश्वासदर्शक ठरावाचा सामना केला होता. पाकिस्तानच्या संविधानाच्या आठव्या सुधारणेनुसार, १९८५ ते २००८ पर्यंत पाकिस्तानच्या सर्व पंतप्रधानांनी नॅशन असेम्ब्लीत विश्वासदर्शक ठरावाचा सामना केला आहे. यामध्ये दिवंगत बेनझीर भुट्टो, नवाज शरीफ, मीर जफरुल्लाह जमाली, चौधरी शुजात, शौकत अजीज आणि युसूफ रजा गिलानी यांचा समावेश होता. नवाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान यांनी आपल्या मर्जीने विश्वासदर्शक ठरावाचा सामना केलेले दुसरे पंतप्रधान आहेत.

सिनेटच्या निवडणुकीत सत्ताधारी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे उमेदवार अब्दुल हफीज शेख यांना पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंटचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी मोठा पराभव केला. हा इम्रान खान सरकारसाठी मोठा झटका होता कारण इम्रान खान यांनी स्वतः शेख यांच्यासाठी प्रचार केला होता. गिलानी यांच्या विजयामुळे उत्साहित झालेल्या विरोधीपक्षांनी इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केलं. याचमुळे इम्रान खान यांनी नॅशनल असेम्ब्लीत विश्वासदर्शक ठरावाची घोषणा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com