esakal | धोक्याची घंटा ! जगातील दोन देशांमध्येच आहेत 30 टक्के नवीन रुग्ण

बोलून बातमी शोधा

corona update}

जगात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 11 कोटी 66 लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत 9 कोटींहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 25 लाखांहून जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

धोक्याची घंटा ! जगातील दोन देशांमध्येच आहेत 30 टक्के नवीन रुग्ण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - जगभरात नव्यानं कोरोनाचं संकट पुन्हा वाढत चाललं आहे. गेल्या 24 तासात जगात जवळपास 4 लाख 37 हजार नवीन रुग्ण आढळले. अमेरिकेत कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी गेल्या 24 तासात 66 हजार 722 रुग्ण सापडले आहेत. यावेळी ब्राझीलमध्ये 75 हजार 337 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे. भारतासह दहा देशांमध्ये दर दिवशी 10 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध कडक केले आहेत. 19 मार्चपर्यंत देशातील सर्व रेस्टॉरंट, बार, इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार देशात नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. काही दिवसांपासून मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. 

इस्रायलमध्ये लसीकरण मोहिमेंतर्गत 49 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. एकूण लोकसंख्येच्या 52.7 टक्के इतकं हे प्रमाण आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत जवळपास 7 लाख 96 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे ओमानमध्ये रविवारपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तर जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं टोक्योसह जवळच्या शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. 

हे वाचा - जगात वर्षभरात 93 कोटी टन अन्न वाया; पाकिस्तानपेक्षा भारतात परिस्थिती वाईट

जगात सर्वाधिक फटका बसलेले देश

अमेरिका 

बाधित - 2 कोटी 95 लाख 93 हजार 145
मृत्यू - 5 लाख 35 हजार 560
कोरोनामुक्त - 2 कोटी 1 लाख 83 हजार 213

भारत
बाधित - 1 कोटी 11 लाख 91 हजार 864
मृत्यू - 1 लाख 57 हजार 693
कोरोनामुक्त - 1 कोटी 8 लाख 52 हजार 174

ब्राझील 
बाधित - 1 कोटी 8 लाख 71 हजार 843
मृत्यू - 2 लाख 62 हजार 948
कोरोनामुक्त - 96 लाख 71 हजार 410

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जगात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 11 कोटी 66 लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत 9 कोटींहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 25 लाखांहून जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या 24 तासात जगात 4 लाख 37 हजार 587 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.