Video: पाकने केले यशस्वी रॉकेट लाँचिंग; ‘सर्किट’ने शेअर केला व्हिडिओ

Video: पाकने केले यशस्वी रॉकेट लाँचिंग; ‘सर्किट’ने शेअर केला व्हिडिओ

मुंबई : भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानं तमाम भारतीयांची निराशा झाली. आजवर चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचण्याचं धाडस कोणीच केलेलं नव्हतं. ते भारतानं केलं आज, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याचे पुरावे मिळाले आहेत. पण, भारताच्या या चांद्रयान मोहिमेची पाकिस्तानकडून खिल्ली उडवण्यात आली होती. Indiafail असा हॅश टॅग पाकिस्तानातून चालवण्यात येत होता. पण, डबघाईला आलेल्या पाकिस्तानचेही एक रॉकेट अवकाशात नुकतेच झेपवाले आहे. त्याबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केले जात आहे.

तू सर्किट आहेस का?
भारताच्या मोहिमेची पाकिस्तानने खिल्ली उडवली असली तरी, भारतीयही पाकची खिल्ली उडवण्यात मागे नाहीत. पाकिस्तानातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चीनी बनावटीच्या एअर बलूनमधून एक रॉकेट अवकाशात सोडल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अभिनेता अर्षद वारसीने ट्विट केलाय. व्हिडिओ शेअर करताना, अर्षदने म्हटलंय की, ‘मला माहिती नव्हतं की, पाकिस्तानातूनही एक रॉकेट लाँच झालंय.’ यावर नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. काहींनी अर्षदच्या सुरात सूर मिसळत पाकिस्तानची खिल्ली उडवलीय. तर, काहींनी अर्षदला मॅच्युअर होण्याचा सल्ला दिलाय. मुन्नाभाई एमबीबीएसमधील शॉट सर्किट या कॅरेक्टरचा संदर्भत देत काहींनी तू सर्किट आहेस का, असंही म्हटलंय.

पाकची अर्थव्यवस्था डबघाईला
भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारत अवकाश संशोधनात खूपच आघाडीवर आहे. पाकिस्तानने आण्विक क्षेपणास्त्र तयार करण्यापलिकडे काहीच केले नाही. आजच्या घडीला. पाकिस्तान या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारही करू शकत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे. देशात महागाई आणि बेजरोजगारीने उच्चांक गाठलाय. अशा परिस्थितीत पाक पंतप्रधान कार्यालयातील महागड्या गाड्या आणि जनावरे विकण्याची वेळ आली आहे. तर, पर्यटनस्थळांवर असणारी शासकीय विश्रामगृहे सामान्यांसाठी खुली करून त्यातून महसूल मिळवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. अशातही भारताला डिवचण्याची संधी पाकिस्तानातील नागरिक सोडत नाहीत. भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेला शेवटच्या टप्प्यात थोडं अपयश आलं. पण, चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अजूनही भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com