बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी झाली होती गायब

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

- बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी झाली होती गायब

नवी दिल्ली : भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात एअर स्ट्राईकची कारवाई केली होती. यादरम्यान पाकिस्तानची आधुनिक ऑगस्ता श्रेणीतील पाणबुडी पीएनएस साद ही पाकिस्तानी पाण्यातून अचानक गायब झाली होती, अशी माहिती केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला केंद्रीय राखीव दलाच्या पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने याचा बदला घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानची आधुनिक ऑगस्ता श्रेणीतील पाणबुडी पीएनएस साद ही पाकिस्तानी पाण्यातून अचानक गायब झाली होती. या पाणबुडीसाठी 21 दिवस शोध घेतला होता, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्दस्त करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan submarine disappeared after Balakot attack